पुणे: इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची दुसरी नियमित फेरीची निवड यादी गुरुवारी जाहीर होत आहे. दुसऱ्या फेरीत १ लाख ३५ हजार ७२ नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तसेच ५ लाख ४ हजार ४०७ विद्याथ्योनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम नोंदवला आहे. या विद्यार्थ्यांना गुणवतेनुसार महाविद्यालय जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा, अशी सूचना माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. दुसरी फेरी पूर्ण करून तिसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागांची माहिती २३ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यभरात अकरावीच्या यंदा २१ लाख ३२ हजार ९६० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. यापैकी पहिल्या फेरीत ५ लाख ७ हजार २८८ विद्याथ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.


