पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (आयसीएसआय) बुधवारी (१६ जुलै) कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (सीएसईईटी) जुलै २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर केला. उमेदवाराच्या विषयवार गुणांची विभागणी संस्थेच्या icsi.edu या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा जुलै २०२५ ची परीक्षा ५ आणि ७ जुलै रोजी घेण्यात आली होती.
सीएस प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच संस्थेच्या पोर्टलवर अपलोड केले जातात. जेणेकरून उमेदवार त्यांच्या संदर्भासाठी, वापरासाठी आणि नोंदींसाठी डाउनलोड करू शकतील. उमेदवारांना निकालाची प्रत दिली जाणार नाही, असे ‘आयसीएसआय’ने जाहीर केले आहे.


