लास वेगास (अमेरिका): येथे होणाऱ्या १६ खेळाडूंच्या फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडू आर. प्रज्ञानानंदला मॅग्नस कार्लसनसोबत एकाच गटात स्थान देण्यात आले आहे, तर अर्जुन एरिगेसी आणि विदित गुजराती हे दुसऱ्या गटात एकत्र आहेत.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला मॅग्नस कार्लसन या वेळीही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करेल. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ७,५०,००० अमेरिकन डॉलर्स आहे, त्यापैकी २,००,००० अमेरिकन डॉलर्स विजेत्यासाठी आहे. विश्वविजेता डी. गुकेश या स्पर्धेत सहभागी होणार नाही, कारण त्याला एका महिन्यात ग्रँडमास्टर टूरच्या मुख्य स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.


