Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पहिली युवा कसोटी; भारत-इंग्लंड सामना ड्रॉ

पहिली युवा कसोटी; भारत-इंग्लंड सामना ड्रॉ

बेकेनहॅम (इंग्लंड): कर्णधार हमजा शेखच्या लढाऊ शतकाच्या बळावर इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाने पहिल्या युवा कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवत सामना ड्रॉ केला.

भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने ६३ षटकांत ७ गडी गमावून २७० धावा केल्या आणि भारताला २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवू दिली नाही. शेखने मंगळवारी येथे १४० चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या. त्याला बेन मेयेसची महत्त्वाची साथ मिळाली, ज्याने ८२ चेंडूंत ५१ धावा केल्या. त्याच्याशिवाय यष्टिरक्षक फलंदाज थॉमस रीव्हने ३५ चेंडूंत ५० धावांचे योगदान दिले. १४व्या षटकात इंग्लंडचा स्कोअर ३ बाद ६२ असा होता; पण त्यानंतर भारत दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरला.

शेख आणि मेयेस यांच्यासोबत उपयुक्त भागीदारी करून इंग्लंडने चांगले पुनरागमन केले. खेळ संपण्यास एक तास शिल्लक असताना, भारताने सलग २ षटकांत धावबाद करून आपल्या विजयाच्या आशा उंचावल्या. प्रथम त्यांनी शेखला बाद केले आणि नंतर पुढच्या षटकात एकांश सिंगला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. पण राल्फी अल्बर्ट (३७ चेंडूंत नाबाद ९) आणि जॅक होम (३६ चेंडूंत नाबाद ७) यांनी दबावाखाली आपली हिंमत दाखवली आणि सामना अनिर्णित राखला. भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात ५४० धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ४३९ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात २४८ धावा करत इंग्लंडसमोर ३५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारताच्या संघाने यापूर्वी ५ सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!