Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बसच्या मागे पळताना ‘हार्ट अ‍ॅटॅक आल्याने वृद्धाचा मृत्यू; पाटस येथील बस थांब्यावर घडली घटना

बसच्या मागे पळताना ‘हार्ट अ‍ॅटॅक आल्याने वृद्धाचा मृत्यू; पाटस येथील बस थांब्यावर घडली घटना

पाटस (पुणे): एसटी बसच्या मागे धावताना अचानक पडून वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाटस (ता. दौंड) येथील बस थांब्यावर घडली. याप्रकरणी पाटस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून त्या व्यक्तीचा ‘हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. पुरुषोत्तम रावसाहेब आटोळे (रा. हादगाव, ता. कर्जत) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम आटोळे हे नंदादेवी (ता. दौंड) येथे मुलीकडे जाण्यासाठी पाटस येथील बस थांब्यावर थांबले होते. यावेळी पाटस येथील बस थांब्यावर बस पुढे निघून गेल्याने बसमध्ये जाण्यासाठी पुरुषोत्तम आटोळे बसच्या मागे पळत असताना ते अचानक खाली पडले. यावेळी स्थानिकांनी पाटस येथील टोल नाका रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिकेतून त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता आटोळे यांना मृत घोषित केले.

यामुळे रुग्णवाहिका चालकाने ही रुग्णवाहिका पाटस पोलीस स्टेशन येथे नेऊन संबंधित व्यक्ती मृत झाल्याची माहिती पाटस पोलीस स्टेशन येथे दिली. रुग्णवाहिका चालकांनी या व्यक्तीच्या मोबाईलवरून त्यांच्या नातेवाईकांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. आटोळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यवत ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. मृत्यू ‘हार्ट अ‍ॅटॅकने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!