Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; 9 लाखाचा मुद्देमाल जप्त

ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; 9 लाखाचा मुद्देमाल जप्त

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंजूरगाव व आलीमघर खाडीमध्ये अवैध हातभट्टी केंद्र नष्ट करण्यासाठी हातभट्टी केंद्रावर धाडसत्र राबवून धडक कारवाई करण्यात आली. पावसाचा फायदा घेत या खाडीत अवैध हातभट्टी मद्य निर्मितीत वाढ झाली होती. त्याअनुषंगाने उत्पादन शुल्कच्या प्रशिक्षित जवानांनी बोटीने जावून सर्व हातभट्टी मद्य निर्मिती ठिकाणे १५ जुलै रोजी नष्ट केली. या कारवाईत एकूण ९ लाख १६ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा १९४९ अंतर्गत ०३ गुन्हे नोंद करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यामध्ये सामूहिक मोहिम राबवून केलेल्या कारवाईत २०० लिटर क्षमतेचे १७८ ड्रम व १००० ली. क्षमतेचे ३ बॉयलर त्यामध्ये ३३ हजार ६०० लीटर रसायन व ३५ ली. गावठी दारु, इतर हातभट्टी साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी काही मुद्देमाल नाशवंत असल्याने तो जागीच नष्ट करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये उप अधीक्षक वैभव वैद्य, दुय्यम निरीक्षक एच. एम. देवकाते, सहा. दुय्यम निरीक्षक रणजीत आडे, तसेच जवान संदिप धुमाळ, अविनाश जाधव, रामचंद्र पाटील, राजु राठोड, भाऊसाहेब कराड, नारायण जानकर, विनोद अहिरे, प्रविण धवणे, रुपेश खेमनार यांचा सहभाग होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!