मुंबई: दिग्दर्शक राकेश रोशन यांना 16 जुलै रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे.
दरम्यान, राकेश रोशन यांची मुलगी सुनैना रोशन यांनी सांगितले की , मानेवर अँजिओप्लास्टी झाली आहे, पण ते आता पूर्णपणे ठीक आहेत. काळजी करण्याचे कारण नाही. ते आता विश्रांती घेत आहे. ‘
यावेळी हृतिकसह राकेश रोशन यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्यासोबत आहेत. हृतिक रोशन, गर्लफ्रेंड सबा आझाद आणि मुलगी सुनैना रुग्णालयात उपस्थित असून त्यांची काळजी घेत आहेत. हृतिकची एक्स वाइफ सुझान खानशी संपर्क साधला असता तिने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आणि कुटुंबाशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर भाष्य करू शकत नसल्याचे सांगितले.
हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या पुढच्या चित्रपट ‘वॉर २’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी आणि ज्युनिअर एनटीआर यांच्याही भूमिका आहेत. नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हृतिकचा अॅक्शन अवतार पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


