Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईत मोठी दुर्घटना..! एका गोविंदाचा मृत्यू, 30 जखमी, दहीहंडी उत्सवात शोककळा

मुंबईत मोठी दुर्घटना..! एका गोविंदाचा मृत्यू, 30 जखमी, दहीहंडी उत्सवात शोककळा

मुंबई : मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष जोरात सुरू असताना मानखुर्द येथे एका दुर्दैवी घटनेने उत्सवावर विरजण पडले आहे. 32 वर्षीय गोविंदा जगमोहन शिवकुमार चौधरी याचा दहीहंडीचा रोप बांधताना तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

जखमी अवस्थेत त्याला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताच्या घटनेनं दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून बाल गोविंदा पथकावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

याशिवाय, सकाळपासून मुंबईतील दहीहंडी उत्सवात 30 गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी 15 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर 15 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजकीय नेते आणि नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्यासह सेलिब्रिटींच्या उपस्थितीत गोविंदा पथकांनी उंच मनोरे रचून विक्रम प्रस्थापित केले, पण या अपघातामुळे बाल गोविंदा पथकावर शोककळा पसरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!