Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आता पाऊस असला तरीही कपडे सुकवण्याची नसणार चिंता; ‘या’ टिप्स ठरतील फायद्याच्या…

आता पाऊस असला तरीही कपडे सुकवण्याची नसणार चिंता; ‘या’ टिप्स ठरतील फायद्याच्या…

सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे सूर्यप्रकश म्हणावा तसा आपल्याला अनुभवायला मिळत नाही. अशा परिस्थितीत सूर्यप्रकाशाअभावी कपडे सुकवण्यात खूप त्रास होताना दिसतो. बऱ्याचदा कपडे अनेक दिवस सुकत नाहीत, ज्यामुळे ते ओले आणि वास येऊ लागतात. पण, आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. त्याने तुम्हाला त्रास होणार नाही.

विशेषतः ऑफिसमध्ये जाणाऱ्या आणि मुलांच्या शाळेच्या गणवेशाची चिंता या पावसाळ्यात सतावू शकते. कारण, हे कपडे वाळणार कधी आणि कसे हा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत, काही सोप्या टिप्स अवलंबून तुम्ही पावसाळ्यातही कपडे सहज सुकवू शकता. बाल्कनी किंवा खिडकीजवळ कपडे सुकवा. पावसाळ्यात, तुम्ही तुमचे कपडे बाल्कनी किंवा खिडकीजवळ वाळवू शकता. कपडे लटकवताना, दोन्ही कपड्यांमध्ये थोडे अंतर राहील याची विशेष काळजी घ्या. यामुळे हवा सहज जाऊ शकेल, ज्यामुळे कपडे लवकर सुकतील.

जर तुम्हाला ओले कपडे लवकर वाळवायचे असतील तर तुम्ही रूम हीटर किंवा पंख्याची मदत घेऊ शकता. कपडे हँगरमध्ये ठेवा आणि पंख्यासमोर लटकवा. यामुळे कपडे लवकर सुकतात आणि त्यांना वास येत नाही.

पावसाळ्यात बऱ्याच वेळा कपडे बराच काळ ओले राहतात, ज्यामुळे त्यात बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू लागतात आणि त्यांना वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत कपडे धुताना व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा वापरा. हे दोन्ही अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल आहेत, ज्यामुळे कपड्यांना वास येत नाही. या टिप्स फॉलो केल्यास तुम्हाल नक्कीच फायदा होऊ शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!