Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ऑनलाईन गेमशी संबंधित कंपन्यांचे घसरत आहेत शेअर्स; ‘हे’ ठरतंय कारण, गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण…

ऑनलाईन गेमशी संबंधित कंपन्यांचे घसरत आहेत शेअर्स; ‘हे’ ठरतंय कारण, गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण…

नवी दिल्ली : ‘रिअल मनी गेम’शी संबंधित कंपन्या आणि त्यांचे गुंतवणूकदार सरकारच्या ऑनलाईन गेमिंग विधेयक २०२५ मुळे घाबरले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यापासून त्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

नझारा टेकच्या शेअर्समध्ये तीन दिवसांत 18 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण दिसून आली. तर डेल्टा कॉर्पपासून ऑन-मोबाईल ग्लोबलपर्यंत या क्षेत्राशी संबंधित इतर कंपन्यांचे शेअर्स देखील पडताना दिसून आले. केंद्र सरकारच्या ऑनलाईन गेमिंग विधेयक २०२५ बद्दल बोलताना, ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ते सादर करण्यात आले आहे, तर रिअल मनी पेमेंटवर आधारित फॅन्टसी स्पोर्ट्स गेम्स, पोकर आणि रमीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे, जी दोन्ही सभागृहात मंजूर झाली आहे.

ऑनलाईन गेमिंग उद्योगात रिअल मनी गेमला आळा घालण्यासाठी मंजूर झालेल्या या विधेयकात नियम मोडणाऱ्यांसाठी कडक तरतुदी आहेत, ज्यामध्ये तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांचा मोठा दंडाची तरतूद आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ऑनलाईन गेम उद्योगाशी संबंधित कंपन्या चांगल्याच घाबरल्या असून, त्यांचे शेअर्स झपाट्याने घसरत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!