आजच्या धावपळीच्या जीवनात, लॅपटॉप किंवा मोबाईलवर तासनतास वाकून बसणे आणि चुकीच्या पद्धतीने उठणे आणि बसणे यामुळे स्लिप डिस्कसारखी गंभीर समस्या निर्माण होते. ही समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा मणक्याच्या दरम्यान असलेली डिस्क त्याच्या जागेवरून घसरते. परिणामी, तीव्र पाठदुखी, पाय सुन्न होणे आणि बराच वेळ उभे राहण्यास किंवा वाकण्यास त्रास होतो. जर वेळीच खबरदारी घेतली नाही तर ही समस्या तुम्हाला आयुष्यभर त्रास होऊ शकतो.
योगाच्या मदतीने स्लिप डिस्कचा त्रास आणि अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. नियमितपणे केल्या जाणाऱ्या काही सोप्या योगासनांमुळे मणक्याची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात आणि नसांवरील दबाव कमी होतो. भुजंगासन हे आसन पाठीचा कणा मजबूत करते आणि नसांवरील दाब कमी करते. भुजंगासनाचा सराव केल्याने ऑस्टियोपोरोसिसच्या सुरुवातीच्या लक्षणांपासून आराम मिळतो.
तसेच शलभासन हेदेखील दररोज पाच मिनिटे शलभासनाचा सराव केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. हे आसन कंबरेच्या स्नायूंना बळकटी देते आणि पाठदुखीपासून आराम देते बालासन हेदेखील फायदेशीर ठरू शकते. बालासनामुळे कणा ताणतो आणि आराम मिळतोच. शिवाय वेदनाही कमी करतो.
मकरासनही ठरू शकते फायदेशीर
मकरासन या योगासनाचा सराव केल्याने कंबर आरामशीर होते आणि ताण कमी होतो. त्याचा सराव करण्यासाठी पोटावर झोपावे लागते. सेतुबंधासन हाही चांगला सराव आहे. सेतुबंधासनाचा सराव केल्याने पाठीचा कणा आणि कंबर मजबूत होते, रक्ताभिसरण सुधारते.


