पुणे : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमदेवारांना पगारही चांगला मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे सहसंचालक आणि सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या पदासाठी पदवीचे शिक्षण आवश्यक असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, १, ३२ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-440 001 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहसंचालक आणि सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 09 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर.
– शैक्षणिक पात्रता : पदवी (निवृत्त अधिकारी).
– वेतन/ मानधन: दरमहा रु. 45,000/- ते रु. 50,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : ६१ वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : २० ऑगस्ट २०२५.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ सप्टेंबर २०२५.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mahasecurity.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


