Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Big Boss 19 मध्ये एंट्री करणार WWE स्टार अंडरटेकर; ‘शो’ची सुरु झाली आता चर्चा

Big Boss 19 मध्ये एंट्री करणार WWE स्टार अंडरटेकर; ‘शो’ची सुरु झाली आता चर्चा

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन लवकरच येत आहे. शोच्या निर्मात्यांनी दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय नावांशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. हे दोन स्टार म्हणजे बॉक्सिंग स्टार माइक टायसन आणि WWE चा आयकॉनिक सुपरस्टार द अंडरटेकर.

टायसन आणि अंडरटेकर हे दोघे शोमध्ये येणार असल्याने सोशल मीडियासह मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. हे सेलिब्रिटी शोमध्ये सामील झाले तर हा बिग बॉसचा आतापर्यंतचा सर्वात स्फोटक सीझन ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय दिग्गज बिग बॉसमध्ये येतील, अशा चर्चा सुरु आहेत. द अंडरटेकर एका आठवड्यासाठी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉसमध्ये सामील होऊ शकतो.

अंडरटेकरचे खरे नाव मार्क कॅलवे आहे. WWE च्या जगात त्याला ‘डेडमॅन’ म्हटले जाते. जर हे निश्चित झाले तर अंडरटेकर बिग बॉसच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी बनू शकतो. त्याच्या आधी, सीझन ४ मध्ये, द ग्रेट खलीला एका आठवड्यासाठी घरात राहण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये देण्यात आले होते.

सर्वाधिक मिळणार मानधन

अंडरटेकर या कमाईपेक्षा जास्त कमाई करू शकतो. अंडरटेकर २०२० मध्ये WWE मधून निवृत्त झाला. मात्र, तो अजूनही पॉप कल्चर आयकॉन आहे. शोमधील त्याची उपस्थिती सीझन ४ मध्ये उपविजेता असलेल्या द ग्रेट खलीच्या यशस्वी वाटचालीची आठवण ताजी करू शकतो.

टायसनच्या करारावर अजूनही चर्चा सुरू

माइक टायसनच्या करारावर अजूनही चर्चा सुरू आहे. वृत्तानुसार, निर्माते ऑक्टोबर २०२५ मध्ये बॉक्सिंग दिग्गजाला विशेष पाहुणे म्हणून आणण्याचा प्लॅन करत आहेत. सात ते दहा दिवसांसाठी हे दोघे असू शकतात. ज्यामुळे चालू हंगामात उत्साह वाढेल. जर हा करार झाला तर टायसनची एंट्री रिअ‍ॅलिटी मालिकेच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय क्रॉसओवरपैकी एक असेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!