आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यावी असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे काहीना काहीतरी उपाय केले जातात. त्यात जर तुम्हाला तुमच्या मुलाला चांगली उंची हवी असेल, तर तुम्ही त्याला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहार द्यावा. यासोबतच, त्याने दररोज व्यायाम केला पाहिजे आणि आवश्यक झोप घेतली पाहिजे. याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
मजबूत हाडांसाठी कॅल्शियम खूप महत्वाचे असते. त्यामुळे दूध, दही, ताक, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ दररोज मुलांना देणे खूप महत्वाचे आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. त्याने शरीराला आवश्यक घटक मिळू शकते. मुलांना दररोज फळे खाण्याची सवय लावा. फळांमध्ये जीवनसत्त्वे अ, ब, क आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात आणि वाढ वाढविण्यास देखील मदत करतात.
याशिवाय, मेथी, पालक, ब्रोकोली, गाजर, कोबी यासारख्या सर्व हिरव्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेच कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, के आणि लोह असते जे हाडांची घनता चांगली राखण्यास मदत करते. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे शरीरातील ऊती दुरुस्त करण्यास मदत करते.
आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा करा समावेश
शरीराच्या ऊती आणि स्नायूंसाठी प्रथिने खूप महत्वाची असतात, म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात अंडी, चिकन, मासे यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही त्यांना दूध, दही, चीज, सोयाबीन, टोफू आणि बीन्स सारखे दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता.


