Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Xiaomi चा नवा Redmi Note 15 Pro लाँच; 50MP कॅमेरासह 7000mAh बॅटरीही मिळणार

नवी दिल्ली :  सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने चीनमध्ये Redmi Note 15 Pro+ आणि Redmi Note 15 Pro लाँच केले आहेत, जे शक्तिशाली फीचर्ससह मिळत आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 90W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी दमदार 7000mAh बॅटरी मिळते.

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला रिव्हर्स चार्जिंगसाठी देखील सपोर्ट मिळतो. Note 15 Pro+ Qualcomm च्या नवीन प्रोसेसर Snapdragon 7s Gen 4 वर काम करतो. त्याच वेळी, Note 15 Pro व्हर्जनमध्ये MediaTek Dimensity 7400 Ultra प्रोसेसर मिळतो. दोन्ही फोन IP68 रेटिंगसह मिळत आहे. कंपनीने Redmi Note 15 Pro+ 1899 युआन (सुमारे 23 हजार रुपये) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे.

तसेच, फोनचा १२ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २०९९ युआन (सुमारे २५ हजार रुपये) आणि १६ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २२९९ युआन (सुमारे २८ हजार रुपये) मध्ये येतो.

काय आहेत फीचर्स?

  • रेडमी नोट १५ प्रो + मध्ये हायपर ओएस २ मिळते, जो अँड्रॉइड १५ वर काम करतो. यात ६.८३-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून,  जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी शाओमी ड्रॅगन क्रिस्टल ग्लास उपलब्ध आहे.
  • हँडसेट स्नॅपड्रॅगन ७एस जेन ४ प्रोसेसरसह येतो. त्यात ५० एमपी मेन लेन्स, ५० एमपी टेलिफोटो लेन्स आणि ८ एमपी अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. त्याच वेळी, कंपनीने फ्रंटला ३२ एमपी सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोन ७००० एमएएच बॅटरी आणि ९० वॅट चार्जिंगसह येतो.
  • नोट १५ प्रो मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० अल्ट्रा प्रोसेसर, ५० एमपी + ८ एमपी ड्युअल रियर कॅमेरा आणि २० एमपी फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये ७००० एमएएच बॅटरी देखील आहे.
Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!