मुंबई: भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साटम यांच्या नियुक्तीची आज (दि. २५) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. साटम यांना मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच अमित साटम यांना मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
कोण आहेत आमदार अमित साटम?
आमदार अमित साटम हे भाजपचे आमदार आहेत. 2014 पासून अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या साटम यांनी 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साटम यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ची पदवी प्राप्त केली आहे.


