Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Realme आणतोय 10000mAh ची बॅटरी असलेला स्मार्टफोन; 320W फास्ट चार्जिंगचा मिळू शकेल सपोर्ट

Realme आणतोय 10000mAh ची बॅटरी असलेला स्मार्टफोन; 320W फास्ट चार्जिंगचा मिळू शकेल सपोर्ट

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने येणाऱ्या फोनबद्दल टीझर आणण्यास सुरुवात केली आहे, जो मोठ्या बॅटरीसह येणार आहे. कंपनीने या नव्या फोनचे नाव अद्याप निश्चित केलेले नाही. मात्र, या फोनमध्ये 10000mAh ची बॅटरी असेल, असे सांगण्यात आले आहे.

Realme ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक नवीन फोन टीझ केला आहे. हा स्मार्टफोन 27 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे, ज्याची घोषणा कंपनीने 10000mAh बॅटरी लिहून केली आहे. त्यामुळे या फोनमध्ये 10000mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर हा कंपनीचा सर्वात मोठा बॅटरी असणार फोन असणार आहे. या फोनमध्ये चांगली वायर्ड चार्जिंग स्पीड मिळणार आहे. ब्रँडने या वर्षाच्या सुरुवातीला चांगली बॅटरी असलेला कॉन्सेप्ट फोन सादर केला होता.

याशिवाय, कंपनीकडून 320 W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल जास्त माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. कंपनीने मे महिन्यात Realme GT कॉन्सेप्ट फोनची माहिती दिली होती. ज्यामध्ये 10000 mAh बॅटरी होती, जी 320W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme ने या वर्षी मे महिन्यात Realme GT 7T भारतात लाँच केला. हा स्मार्टफोन 6.8 इंचाच्या डिस्प्लेसह येतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8400 Max प्रोसेसरसह येतो. यात 12GB RAM आणि 512GB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!