पुणे : तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असाल तर आता तुम्हाला हा शोध थांबवण्याची गरज आहे. कारण, आम्ही तुम्हाला एका नोकरीची माहिती देणार आहोत. ‘रेल इंडिया’ येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा येथे निवासी अभियंता (विद्युत) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी राईट्स प्रोजेक्ट युनिट, मुंबई (वाशी) व्हॅट-७४१/७४२, चौथा मजला, टी-७, सेक्टर-३०अ, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, नवी मुंबई –४००७०३ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
- पदाचे नाव : निवासी अभियंता (विद्युत).
- एकूण रिक्त पदे : 01 पदे.
- नोकरीचे ठिकाण : मुंबई.
- वेतन / मानधन : दरमहा रु. 1,04,496
- वयोमर्यादा : ६२ वर्षांपर्यंत.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ सप्टेंबर २०२५.
- मुलाखतीची तारीख : ०२ सप्टेंबर २०२५.
- या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.rites.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


