मुंबई : सध्या बिग बॉस-19 प्रीमियर दिवस जवळ येत आहे. त्यानुसार, या शोच्या चाहत्या वर्गातही प्रचंड उत्सुकता आहे. दररोज या शोबद्दल नवीन अपडेट्स समोर येत आहेत. ‘सीझन 19’ साठी अनेक स्पर्धकांची नावे निश्चित करण्याचा विचार केला जात आहे. मात्र, या शोमध्ये ‘द ग्रेट खली’पासून ते अंकिता लोखंडेपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. हे जेव्हा आले तेव्हा चांगले मानधनही दिलं गेलं. पण, सर्वाधिक मानधन नेमकं कोणी घेतलं याची माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
‘द ग्रेट खली’ हा डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू आहे. द ग्रेट खलीचे नाव बिग बॉसच्या सर्वात महागड्या स्पर्धकांमध्ये देखील आहे. खली बिग बॉस 4 मध्ये दिसला होता. रिपोर्ट्सनुसार, त्याला एका आठवड्यासाठी 50 लाख रुपये फी देण्यात आली होती. तसेच अंकिता लोखंडे ही टीव्हीवरील मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता बिग बॉस 17 मध्ये दिसली होती. तिच्याबद्दल असे वृत्त आहे की, ती तिच्या सीझनमधील सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक होती. निर्मात्यांनी तिला शोमध्ये राहण्यासाठी आठवड्याला 11 ते 12 लाख रुपये दिले होते.
याशिवाय, बिग बॉस 12 ची विजेती दीपिका कक्कर तिच्या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक असल्याचेही म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाची एका आठवड्याची फी 15 लाख रुपये होती. तिला शोमध्ये खूप पसंती मिळाली.
पामेला अँडरसनने घेतली सर्वाधिक मानधन
या शोमध्ये लोकप्रिय अमेरिकन अभिनेत्री पामेला अँडरसन ही बिग बॉसच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक मानली जाते. पामेला बिग बॉस 4 मध्ये दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, तिला फक्त 3 दिवस शोमध्ये राहण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची मोठी रक्कम देण्यात आली होती.


