Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपट उच्च न्यायालय पाहणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपट उच्च न्यायालय पाहणार

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट पाहण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे. आम्ही चित्रपटाच्या निर्मात्यांच्या याचिकेवर निर्णय देऊ; पण त्याआधी हा चित्रपट पाहू, असे न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर केले नसल्याचा दावा करून आणि आणखी काही आक्षेप घेऊन सीबीएफसीने चित्रपटाला प्रदर्शन प्रमाणपत्र नाकारले होते. त्याविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर निर्णय दिला जाईल. तथापि, त्याआधी चित्रपट पाहू, असे स्पष्ट केले. तसेच सीबीएफसीने आक्षेप घेतलेली दृश्ये चिन्हांकित करून चित्रपटाची प्रत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने निर्मात्यांना दिले व सुनावणी २५ ऑगस्टला ठेवली.

तत्पूर्वी, सिनेमॅटोग्राफ कायद्याअंतर्गत अन्य कायदेशीर पर्याय उपलब्ध असले तरी उच्च न्यायालय त्यांच्या याचिकेवर निर्णय घेऊ शकते, असे निर्मात्यांच्या वतीने वरिष्ठ वकील रवी कदम यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच सीबीएफसीने प्रमाणपत्र नाकारून केवळ चित्रपट निर्मात्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले नाही, तर एका खासगी व्यक्तीकडून (योगी आदित्यनाथ) ना हरकत प्रमाणपत्र घेण्यास सांगून अधिकार क्षेत्राबाहेर निर्णय घेतला आहे, असा दावाही कदम यांनी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!