Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक…! तरुणाच्या गुद्दद्वारात अडकला प्लास्टिक पाईप; डॉक्टरही थक्क, नेमकं काय घडलं?

धक्कादायक…! तरुणाच्या गुद्दद्वारात अडकला प्लास्टिक पाईप; डॉक्टरही थक्क, नेमकं काय घडलं?

अकोला : अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत भयावह आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ३० वर्षीय तरुणाच्या गुद्दद्वारात सुमारे दोन ते अडीच फूट लांबीचा प्लास्टिक पाईप अडकल्याची घटना घडली असून, एक्स-रेनंतर डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. या तरुणाला तात्काळ अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रात्री साडेनऊ वाजता शस्त्रक्रियेद्वारे पाईप काढण्याची तयारी सुरू आहे.

ही घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरली असून, वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये चिंता वाढली आहे. तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असली तरी गुद्दद्वाराजवळ मोठी जखम झाल्याने त्याला शौचास जाणेही कठीण झाले आहे.

घरातील अपघात की काहीतरी गुप्त रहस्य?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना अकोला जिल्ह्यातील एका तरुणासोबत घडली. नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, तरुण घरात पलंगावरून खाली पडला आणि त्यावेळी हा प्लास्टिक पाईप त्याच्या गुद्दद्वारात अडकला. मात्र, या स्पष्टीकरणावर वैद्यकीय तज्ज्ञ आणि स्थानिक लोकांमध्ये शंका घेतल्या जात आहेत.

एक्स-रे तपासणीत पाईपचा मोठा भाग (सुमारे ८ ते ९ इंच) गुद्दद्वारात आत अडकलेला असल्याचे उघड झाले आहे. यामुळे डॉक्टरही हैराण झाले. पाईपची लांबी दोन ते अडीच फूट असल्याने, तो आत किती खोलवर गेला आहे, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. या अपघातामुळे तरुणाच्या गुद्दद्वाराजवळ गंभीर दुखापत झाली असून, त्यामुळे रक्तस्राव आणि वेदना होत आहेत.

तरुणाला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, तरुणाने अद्याप पूर्ण खुलासा केला नाही. “हा पाईप आत कसा अडकला, याचे खरे कारण समजल्याशिवाय शस्त्रक्रिया अधिक कठीण होईल. पण रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याने रात्री शस्त्रक्रिया करणार आहोत,” असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!