पुणे : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 30 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ, MSTrIPES ऑपरेटर कम GIS तज्ञ, CSR व्यवस्थापक, PRO/ कम्युनिकेशन व्यवस्थापक आणि घनकचरा व्यवस्थापक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ, MSTrIPES ऑपरेटर कम GIS तज्ञ, CSR व्यवस्थापक, PRO/ कम्युनिकेशन व्यवस्थापक आणि घनकचरा व्यवस्थापक.
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– नोकरीचे ठिकाण : बोरिवली, मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 40,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 22 ऑगस्ट 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसंचालक कार्यालय (दक्षिण) बोरिवली, (पूर्व), मुंबई ४०० ०६६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://sgnp.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


