Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

क्रेडिट कार्ड ते पोस्टाच्या सेवेपर्यंत आजपासून होतील ‘हे’ मोठे बदल; तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

क्रेडिट कार्ड ते पोस्टाच्या सेवेपर्यंत आजपासून होतील ‘हे’ मोठे बदल; तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

नवी दिल्ली : दरवर्षीप्रमाणे सप्टेंबरपासूनही काही मोठे बदल होत आहेत. ज्यामुळे सामान्य लोकांच्या आर्थिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. सप्टेंबरमध्ये आधार कार्ड अपडेट, आयटीआर, यूपीएस आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होत आहे. दर महिन्याप्रमाणे एलपीजी गॅसच्या किमतींवरही परिणाम दिसून येऊ शकतो.

जेट इंधन आणि सीएनजी-पीएनजीच्या किमतीतही बदल होऊ शकतो. यावेळी आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३० जुलैवरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ज्यामुळे करदात्यांना रिटर्न दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. मात्र, आता ही वेळ या महिन्यात संपेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला १५ सप्टेंबरपूर्वी आयटीआर दाखल करावे लागेल. याशिवाय, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) निवडण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. पूर्वी ही तारीख ३० जून होती. मात्र, नंतर ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली.

पोस्ट विभाग (DOP) १ सप्टेंबर २०२५ पासून देशांतर्गत पोस्टल सेवेचे स्पीड पोस्ट सेवेमध्ये विलीनीकरण करत आहे. आता कोणतंही पार्सल फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवता येणार आहे. म्हणून जर तुम्ही १ सप्टेंबरपासून देशातील इंडिया पोस्टद्वारे कोणतेही नोंदणीकृत पोस्ट पाठवले तर ते स्पीड पोस्ट डिलिव्हरी असेल.

SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर…

SBI कार्डने १ सप्टेंबर २०२५ पासून त्यांच्या निवडक कार्डांसाठीच्या नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत. कंपनीने त्यांच्या काही कार्डांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स प्रोग्राममध्ये सुधारणा केली आहे. यामुळे, असे कार्ड धारण करणारे ग्राहक सरकारी वेबसाइटवरील डिजिटल गेमिंग आणि व्यवहारांशी संबंधित खर्चावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळवू शकणार नाहीत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!