पुणे : ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाउसिंग फायनान्स’ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यामध्ये विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 22 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाउसिंग फायनान्स’ येथे अप्रेंटिससह अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
- पदाचे नाव : अप्रेंटिस.
- एकूण रिक्त पदे : 192 पदे (महाराष्ट्रात 25 पदे).
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
- शैक्षणिक पात्रता : पदवी.
- वेतन / मानधन : दरमहा 1200०
- वयोमर्यादा : २० वर्षे ते २५ वर्षे.
- निवड प्रक्रिया : ऑनलाईन लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, वैयक्तिक मुलाखत.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन नोंदणी.
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2025.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.lichousing.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


