नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी इंडकल टेक्नॉलॉजी आता त्यांचा सर्वात मोठा स्मार्ट टीव्ही लाँच करत आहे. कंपनीने त्यांच्या इन-हाऊस ब्रँड वोबल डिस्प्लेच्या बॅनरखाली हा टीव्ही होत आहे. हा भारतातील सर्वात मोठा स्मार्ट टीव्ही असणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
कंपनीने वोबल मॅक्सिमस सीरीजमध्ये तीन स्क्रीन साईजचा पर्याय दिला आहे. या सीरीजमधील सर्वात मोठे मॉडेल ११६.५-इंच डिस्प्लेसह येणार आहे. हा टीव्ही गुगल टीव्ही ५.० वर काम करेल. कंपनीच्या माहितीनुसार, हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्राहकांसाठी तयार टीव्ही आहे. मात्र, कंपनीने हा टीव्ही अद्याप लाँच केलेला नाही. या टीव्हीची अनेक फीचर्स सध्या समोर आली आहेत. त्यामध्ये वोबल मॅक्सिमस सीरीजमध्ये QLED + MiniLED डिस्प्ले तंत्रज्ञान उपलब्ध असेल.
हा टीव्ही अँड्रॉइड १४ वर आधारित गुगल टीव्ही ५.० सह उपलब्ध असणार आहे. इंडकल टेक्नॉलॉजीनुसार, हा टीव्ही २००० निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतील. याचा अर्थ असा की टीव्हीची ब्राइटनेस भारतात उपलब्ध असलेल्या बहुतेक मॉडेल्सपेक्षा जास्त असेल. ते एचडीआर आणि डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करणार आहे. कंपनीने या टीव्हीची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.


