आपण निरोगी असावं असे अनेकांना वाटत असतं. शरीर निरोगी ठेवणे आणि दीर्घ आयुष्य जगणे अशी अनेकांची इच्छा असते. सध्याच्या धावपळीचे जीवन, वायू प्रदूषण, ताणतणाव, जंक फूड आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आपले सरासरी आयुर्मान खूपच कमी झाले आहे. एक-दोन दशकांपूर्वी, जिथे लोक ८०-९० वर्षे निरोगी जगत होते, तिथे आता लोकांचे सरासरी वय ६०-७० पर्यंत खाली आले आहे.
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जगातील अनेक देशांमध्ये सरासरी आयुर्मान हळूहळू कमी होत आहे आणि ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. अलिकडच्या अहवालात, पुरुषांपेक्षा महिला शंभर वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता सुमारे पाच पट जास्त असते, म्हणजेच महिला १०० वर्षांची वयोमर्यादा सहजपणे ओलांडू शकतात. जेव्हा संशोधकांनी याची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आढळले की पुरुषांमध्ये धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण जास्त आहे.
हे प्रमाण जे केवळ अनेक प्रकारच्या आजारांचे मुख्य कारण नाही तर अकाली मृत्यूचा धोका देखील वाढवते. हेच कारण आहे की, महिला सध्या पुरुषांपेक्षा जास्त काळ जगत आहेत. त्यामुळे जर तुम्ही कोणतंही व्यसन करत असाल तर त्यापासून दूर राहणं गरजेचे आहे.


