Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jio चा धमाका ! 50 कोटी युजर्संना देणार मोठं गिफ्ट; फ्रीमध्ये मिळणार 5G डाटा अन् बरंच काही…

Jio चा धमाका ! 50 कोटी युजर्संना देणार मोठं गिफ्ट; फ्रीमध्ये मिळणार 5G डाटा अन् बरंच काही…

नवी दिल्ली : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून आपापल्या ग्राहकांसाठी दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न असतो. त्यात आता रिलायन्स जिओ देखील कमी नाही. कंपनी आता ५ सप्टेंबर रोजी त्याच्या लाँचच्या १० व्या वर्षात प्रवेश करत आहे. नेमकी हीच संधी साधत कंपनीने ५० कोटींहून अधिक ग्राहकांना एक खास भेट देत अनेक नवीन सेलिब्रेशन प्लॅन लाँच केले आहेत. या ऑफरमध्ये मोफत डेटा, ओटीटी सबस्क्रिप्शन, डिजिटल गोल्ड आणि आकर्षक व्हाउचर यासारख्या सुविधांचा समावेश आहे.

भारताच्या टेलिकॉम उद्योगाला पूर्णपणे बदलून टाकणारी मुकेश अंबानी यांची ही कंपनी ५ सप्टेंबर रोजी ९ वर्षे पूर्ण करणार आहे. ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, कंपनीने ५० कोटींहून अधिक ग्राहकांना एक खास भेट देत अनेक नवीन सेलिब्रेशन प्लॅन लाँच केले आहेत. जिओने ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान त्याच्या सर्व ५G स्मार्टफोन युजर्संना मोफत अमर्यादित डेटा देण्याची घोषणा केली आहे.

युजर्सचा सध्याचा प्लॅन काहीही असो, तो या तीन दिवसांसाठी मोफत हाय-स्पीड डेटाचा लाभ घेऊ शकेल. त्याच वेळी, 4G ग्राहकांसाठी, कंपनीने 39 रुपयांचा डेटा अॅड-ऑन पॅक लाँच केला आहे, ज्यामध्ये दररोज 3GB पर्यंत अतिरिक्त डेटा उपलब्ध असेल.

याशिवाय, जिओने 349 रुपयांचा रिचार्ज वर्षभर सलग 12 वेळा करणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास योजना देखील आणली आहे. या अंतर्गत, वेळेवर 12 महिने रिचार्ज पूर्ण केल्यानंतर, 13 व्या महिन्याची सेवा मोफत दिली जाणार आहे.

महिनाभर चालणारा सेलिब्रेशन प्लॅन

5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत चालणारा हा ऑफर 349 रुपयांचा किंवा त्याहून अधिक कालावधीचा दीर्घकालीन प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध असेल. या पॅकमध्ये, दररोज 2GB किंवा त्याहून अधिक डेटा रिचार्ज करणाऱ्यांना अमर्यादित 5G डेटा दिला जाईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!