पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यासाठी 17 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ येथे सहाय्यक संशोधन अभियंता, संशोधन सहयोगी, तांत्रिक सहाय्यक या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दापोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
- पदाचे नाव : सहाय्यक संशोधन अभियंता, संशोधन सहयोगी, तांत्रिक सहाय्यक.
- एकूण रिक्त पदे : 04 पदे
- नोकरीचे ठिकाण : पुणे.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ सप्टेंबर २०२५.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : असोसिएट डीन, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डीबीएसकेकेव्ही दापोली, जिल्हा- रत्नागिरी (महाराष्ट्र), पिन – ४१५७१२.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.dbskkv.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


