पुणे : शासकीय विभागात नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 30 सप्टेंबर, 2025 रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. वनविभाग कार्यालय, ठाणे येथे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, आर्किटेक्ट, कायदेशीर सल्लागार, ग्राफिक डिझायनर, उपजीविका तज्ञ, जलद बचाव पथक सदस्य यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, आर्किटेक्ट, कायदेशीर सल्लागार, ग्राफिक डिझायनर, उपजीविका तज्ञ, जलद बचाव पथक सदस्य.
– एकूण रिक्त पदे : 14 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे.
– वेतन / मानधन : दरमहा 15000 ते 60000 पर्यंत (प्रवास भत्ता वगळून).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाईन (स्पीड पोस्टने / प्रत्यक्षरित्या).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक कार्यालय, (वन्यजीव) ठाणे, एल.बी.एस. मार्ग, तीन हाट नाका, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : dcfwlthane@gmail.com
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 30 सप्टेंबर 2025.
– मुलाखतीचा पत्ता : उपवनसंरक्षक कार्यालय, (वन्यजीव) ठाणे, एल.बी.एस. मार्ग, तीन हाट नाका, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


