Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed Accident : बीडमध्ये हृदयद्रावक अपघात; माजी सरपंच आणि नातीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Beed Accident : बीडमध्ये हृदयद्रावक अपघात; माजी सरपंच आणि नातीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

बीड : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी-नाथरा मार्गावर मंगळवारी (10 सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने जळगाव तांडा परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात जळगाव तांडा येथील माजी सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय 55) आणि त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय 8) यांचा जागीच मृत्यू झाला, तर वसंत यांच्या पत्नी कस्तुराबाई चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत. कस्तुराबाई यांना तातडीने अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत चव्हाण हे आपली नात श्रुती आणि पत्नी कस्तुराबाई यांच्यासह परळीतील एका खासगी रुग्णालयात श्रुतीच्या उपचारासाठी गेले होते. श्रुतीवर उपचार पूर्ण झाल्यानंतर ते तिघेही बुलेट मोटारसायकलवरून गावाकडे परतत होते. पांगरी-नाथरा मार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ यश कंपनीच्या टिप्परने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, वसंत चव्हाण आणि श्रुती यांचा जागीच मृत्यू झाला, तर कस्तुराबाई गंभीर जखमी झाल्या. हा अपघात जुन्या पांगरी गावातील नागरगोजे यांच्या आखाड्यासमोर घडला.

अपघाताची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी कस्तुराबाई यांना तातडीने अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अपघाताचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, टिप्परच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला, परंतु स्थानिकांमध्ये यामागे घातपाताची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. पोलिस याबाबत सखोल तपास करत आहेत, ज्यामुळे अपघात की घातपात याचा खुलासा होईल.

या दुर्दैवी घटनेमुळे जळगाव तांडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. वसंत चव्हाण हे माजी सरपंच म्हणून गावात मानाचे स्थान असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकाली निधनाने आणि चिमुकली श्रुतीच्या मृत्यूने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कस्तुराबाई यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य केले, परंतु दोघांचा जीव वाचवता आला नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!