Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

व्यापारी गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नृत्यांगना पूजा गायकवाडला अटक

व्यापारी गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नृत्यांगना पूजा गायकवाडला अटक

सोलापूर: मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. 38 वर्षीय व्यापारी गोविंद जगन्नाथ बर्गे हे त्यांच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या डोक्यात गोळी लागलेली होती. ही कार सासुरे गावच्या परिसरात उभी असल्याची माहिती स्थानिकांनी वैराग पोलिसांना दिल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. घटनास्थळावरून एक पिस्तूल जप्त करण्यात आले असून सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे मानले गेले होते. मात्र, पुढील तपासात प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गोविंद बर्गे हे बीड जिल्ह्यातील रहिवासी असून विवाहित होते. त्यांना दोन मुले आहेत. बर्गे यांचे सासुरे गावातील रहिवासी पूजा देवीदास गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते. पूजा ही पारगाव कला केंद्राशी संबंधित लावणी नृत्यांगना आहे. तपासात समोर आले की, बर्गे यांनी तिला अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन भेट दिला होता. परंतु अलीकडे त्यांच्यात सतत वाद होत होते. सोमवारी रात्री बर्गे गाडीने पूजाच्या घरी गेले होते.

दरम्यान, या प्रकरणात बर्गे यांचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, पूजा गायकवाड वारंवार गोविंदला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. या सततच्या छळामुळे बर्गे मानसिक तणावाखाली होते आणि त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पूजा गायकवाडला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तथापि, पोलिस आता आत्महत्येसह हत्येच्या शक्यतेचाही तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तपास पूर्ण होईपर्यंत अनेक महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!