जगभरातील बहुतेक तरुण त्रस्त आणि नैराश्यग्रस्त असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले. आजच्या तरुणांना अनेक सामाजिक आणि वैयक्तिक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहेत, ज्यामुळे ते दुःखी आणि नैराश्यग्रस्त आहेत. पण, मध्यमवयीन (सामान्यतः ४० ते ६० वयोगटातील) लोक पूर्वीसारखे दुःखी नसल्याचे दिसून आले.
तरुणांमध्ये आनंददायी वातावरण कमी असल्याचे दिसून आले. जुन्या अभ्यासात असे आढळून आले की, वयानुसार आनंददायी वातावरणही बदलत जाते. अनेक तरुण असताना खूप आनंदी होते, ते आयुष्याच्या मध्यभागी कमी आनंदी होते आणि नंतरच्या काळात ते पुन्हा आनंदी असल्याचे समोर आले आहे. मध्यमवयीन जीवन हा सर्वात आव्हानात्मक काळ असतो. २०२० ते २०२५ पर्यंत अमेरिका आणि ब्रिटनसह ४४ देशांमधील लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, वयानुसार मानसिक आरोग्यात सातत्याने सुधारणा होत आहे.
आजच्या तरुणांमध्ये याच्या उलट आहे. आता तरुणांमध्ये जास्त ताण, नैराश्य आणि चिंता आढळून येत आहे. तर मध्यमवयीन किंवा वृद्धांना अशा समस्या कमी येत आहेत. त्यासाठी स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे आणि त्यानंतर चिंता आणि एकटेपणा येऊ शकतो. त्यातच आर्थिक दबाव, मंदी, नोकरीची असुरक्षितता आणि महागाई यांमुळेही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


