Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅन्सरच्या उपचारांबद्दल पसवली जातीये चुकीची माहिती; ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, करू नका दुर्लक्ष…

कॅन्सरच्या उपचारांबद्दल पसवली जातीये चुकीची माहिती; ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, करू नका दुर्लक्ष…

सध्या इंटरनेटवर आरोग्याशी संबंधित माहिती मिळवणे खूप सोपे झाले आहे. मात्र, ही सहजता कधीकधी धोकादायक ठरू शकते. कर्करोग अर्थात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराबद्दल सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती (कॅन्सर क्युअर स्कॅम्स) पसरवली जात आहे. त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

भीती आणि गोंधळ हे शस्त्र बनले आहेत. कर्करोगाचे नाव ऐकताच बहुतेक लोक भीती आणि घबराटीने जगत असतात. या भीतीचा फायदा घेत बरेच लोक खोटे दावे आणि खोटे उपचारांना प्रोत्साहन देतात. सोपी भाषा, वैज्ञानिक पुराव्याशिवाय दिलासा देणारी आश्वासने हे या बनावट माहितीचे सर्वात मोठे शस्त्र आहे. तर खऱ्या वैद्यकीय पद्धतीमध्ये वेळ, संयम आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा समावेश असतो, ज्या स्वीकारण्यास लोक सहसा कचरतात.

केमोथेरपीबद्दल बहुतेक गैरसमज पसरवले जातात. अनेक सोशल मीडिया पोस्ट असा दावा करतात की, या उपचारामुळे कर्करोग दूर होत नाही, तर तो आणखी वाढतो. सत्य हे आहे की, केमोथेरपीचे दुष्परिणाम उद्भवू शकतात. मात्र, यातून जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि रुग्णाच्या जगण्याची शक्यता वाढवते. त्यामुळे सोशल मीडियावर येणारी सगळीच माहिती बरोबर असते असेही नाही.

लोक सहसा अशा मेसेजकडे लक्ष देतात जे संभाव्य हानीबद्दल अधिक बोलतात. कर्करोगाचा उपचार घेऊ नका, तो घातक आहे, असा मेसेजही पसरवला जात आहे.  सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे दक्षता आणि जागरूकता.  या सर्व परिस्थितीत डॉक्टर आणि तज्ञांच्या मतांवर नेहमी विश्वास ठेवा. याने फायदा होऊ शकतो. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटवर आढळणाऱ्या प्रत्येक ‘उपचार’ किंवा ‘घरगुती उपाय’वर लगेच विश्वास ठेवू नका. एकदा आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्या. त्याने पुढील धोका टाळता येऊ शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!