Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीच्या पावसानं हाहाकार माजवलाय. हवामान खात्याने आज (15 सप्टेंबर) राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून, काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलंय.
ऑरेंज अलर्ट: मुसळधार पावसाचा इशारा
रायगड: जोरदार पाऊस आणि वादळी वारे.
रत्नागिरी: मुसळधार पावसाची शक्यता.
पुणे (घाटमाथा): अतिवृष्टीचा धोका.
सातारा (घाटमाथा): जोरदार पाऊस आणि वादळी वारे.
यलो अलर्ट: जोरदार वादळी पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे, पालघर: विजांसह पाऊस आणि वादळी वारे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर (घाटमाथा): मध्यम ते जोरदार पाऊस.
अहिल्यानगर, पुणे, सातारा: काही भागात जोरदार पाऊस.
छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, वर्धा: विजांसह पावसाची शक्यता.
यलो अलर्ट: विजांसह वादळी पावसाचा इशारा
नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव: मध्यम पाऊस आणि वीज.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर: वादळी पावसाची शक्यता.
बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव: विजांसह पाऊस.
बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया: मध्यम पाऊस आणि वादळी वारे.
मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा
हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच वाऱ्याचा वेग देखील ३०-४० किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून यासंदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने आज सकाळी नवीन अलर्ट जारी केला. त्यानुसार मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता
आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.


