Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याने शिवसैनिकांमध्ये संताप; आरोपीचा शोध सुरू

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याने शिवसैनिकांमध्ये संताप; आरोपीचा शोध सुरू

मुंबई: मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क परिसरात आज सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी तातडीने पुतळ्याजवळ धाव घेतली आणि परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीची हालचाल दिसून आली असून त्याचा शोध सुरू आहे. हा प्रकार सकाळी 6.10 नंतर घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही. स्थानिक आमदार आणि खासदार घटनास्थळी पोहोचले असून, ठाकरे गटाकडून या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

Ayush Komkar Case : आयुष कोमकर खून प्रकरणात पिस्तूल कोणी पुरवले? खरा मास्टरमाइंड समोर?

दरम्यान, खासदार अनिल देसाई यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा भ्याड प्रवृत्तीच्या लोकांना कधीच योग्य संस्कार मिळाले नसावेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की, अशा घटनांना आळा घालण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. आज घडलेली घटना ही निषेधाच्या पलीकडे जाणारी आहे. हे सरकारच्या अपयशाचे स्पष्ट उदाहरण आहे. आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करत असून याची माहिती उद्धव ठाकरेंनाही देण्यात आली आहे, असेही देसाई यांनी सांगितलं.

अनिल देसाई पुढे म्हणाले की, भेकड आणि समाजकंटक यांना योग्य प्रत्युत्तर मिळेल. सध्या तपास सुरू असून घटनास्थळावरील लाल रंग हटवण्यात आला आहे आणि संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मुंबई सुरक्षित नाही, सरकार काय करतंय? केवळ कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे, अशी टीका करत त्यांनी या घटनेवर निषेध नोंदवला.

या घटनेनंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने परिसरात जमले होते. त्यांनी पुतळ्याची साफसफाई केली तसेच सरकारवर टीकास्त्र सोडले. स्थानिक आमदार महेश सावंत यांनीही घटनेची माहिती देत सांगितले की, दुपारपर्यंत आरोपीबाबत ठोस माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या विटंबनेच्या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुलढाणा येथे ठाकरे गटाचे शिवसैनिक आंदोलन करणार असल्याचे समजते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!