Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी करणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी करणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी सप्टेंबरच्या अखेरीस मुंबई भेटीदरम्यान मेट्रो लाईन 3 च्या वरळी-कफ परेड मार्गाचे उद्घाटनही करणार आहेत. नगरविकास अधिकाऱ्यांनी सांगितले की, काळबादेवी आणि गिरगाव ही दोन मेट्रो स्टेशन अद्याप तयार नसली तरी उद्घाटनानंतर प्रवाशांसाठी चारपैकी दोन प्रवेशद्वार खुले राहतील.

विमानतळाची वैशिष्ट्ये:

  • दोन समांतर धावपट्टे आणि अत्याधुनिक टर्मिनल
  • हरित पायाभूत सुविधा व 37 मेगावॅट अक्षय ऊर्जा वापर
  • साइटवरील सर्व वाहने इलेक्ट्रिक किंवा पर्यायी इंधनावर चालणारी
  • 360-डिग्री बारकोड स्कॅनिंगसह जगातील सर्वात जलद बॅगेज हँडलिंग सिस्टम
  • रस्ता, रेल्वे, जलमार्ग व मेट्रोद्वारे सोयीस्कर कनेक्टिव्हिटी
  • अटल सेतू, कोस्टल रोड व प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे सहज पोहोच

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना अनेक दशकांपूर्वी मांडली गेली होती. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मात्र कोविड-19 महामारीमुळे जवळपास अडीच वर्षे काम ठप्प राहिले, तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही उशीर झाला. आता शेवटी 30 सप्टेंबर रोजी NMIA प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबई आणि उपनगरी भागातील हवाई वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!