नवी दिल्ली : सध्या जगभरात गुगलचा वापर वाढताना दिसत आहे. त्यानुसार, कंपनीकडूनही अनेक फीचर्स आणले जात आहेत. त्यातच गुगल विंडोज युजर्ससाठी एका नवीन प्रायोगिक अॅपवर काम करत आहे. ‘गुगल अॅप फॉर विंडोज’ नावाचे हे अॅप गुगल सर्च लॅब्सद्वारे आणले जात आहे. या अॅपच्या माध्यमातून अनेक बेस्ट फीचर्स मिळणार आहेत.
गुगलचे हे अॅप तुमच्या कामात व्यत्यय न आणता जलद आणि सोपा सर्च अनुभव देणार आहे. या अॅपद्वारे, तुम्ही केवळ वेबवर शोधू शकत नाही तर तुमच्या संगणकावर सेव्ह केलेल्या फाईल्स, गुगल ड्राईव्हमधील फाईल्स आणि इंस्टॉल केलेले अॅप्स देखील जलद शोधू शकता. गुगलचे हे विंडोज अॅप क्रोम प्रमाणेच इन्स्टॉल करते आणि ते वापरण्यासाठी गुगल अकाउंटने साईन-इन करणे आवश्यक आहे. हे अॅप Alt+Space शॉर्टकटने उघडता येते, जिथे तुम्हाला सर्च बार मिळेल.
तसेच तुम्ही या बारमध्ये काहीही शोधू शकता, मग ते फाईल्स असोत किंवा वेब रिझल्ट असोत. हा सर्च बार macOS च्या स्पॉटलाईट सर्चसारखा दिसतो. रात्री काम करणाऱ्या युजर्ससाठी चांगला अनुभव देण्यासाठी त्यात डार्क मोड देखील आहे. अॅपमध्ये एआय मोड, इमेजेस, न्यूज, व्हिडिओज आणि शॉपिंग सारखे टॅब आहेत, जे सर्व सहजपणे स्विच केले जाऊ शकतात. इंस्टॉलेशननंतर, अॅप तुमच्या डेस्कटॉपवर एक सर्च बार देखील ठेवतो, जो तुम्ही ड्रॅग, ड्रॉप आणि राईझ करू शकता.
तपशीलवार मिळेल माहिती
गुगल सर्च प्रमाणेच, एआय मोडद्वारे तपशीलवार उत्तरे दिली जातात. तुम्ही एआय मोड अक्षम करू शकता किंवा शॉर्टकट बदलू शकता. हा पर्याय अॅपच्या कॉन्फिगरेशन मेनूमध्ये उपलब्ध असणार आहे.


