नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात आता iPhone 17 सीरीज, iPhone Air आणि Airpods ची विक्री आजपासून सुरु झाली आहे. कंपनीने ९ सप्टेंबर रोजी झालेल्या अवे ड्रॉपिंग इव्हेंटमध्ये हे सर्व प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत. यापूर्वी तुम्ही हे प्रॉडक्ट्स प्री-ऑर्डर करू शकत होता. पण, आता त्यांची विक्री आजपासून सुरू होत आहे.
तुम्ही ती अॅपलच्या अधिकृत वेबसाईट, अॅपल स्टोअर्स, प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाईन रिटेलर्सवरून खरेदी करू शकता. अॅपलने भारतात दोन नवीन स्टोअर्स उघडले आहेत आणि हे गॅजेट्स सकाळी 8 वाजता या सर्व स्टोअर्समध्ये उपलब्ध असतील. अॅपलचे आता भारतात एकूण चार स्टोअर्स आहेत. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि पुणे या ठिकाणी स्टोअर्स आहेत. या सर्व स्टोअर्समध्ये अॅपलचे नवीन आयफोन, वॉच आणि एअरपॉड्स असणार आहेत.
iPhone 17 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी ₹८२९०० पासून सुरू होते. iPhone Air ₹११९९०० पासून सुरू होते. iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max अनुक्रमे ₹१३४९०० आणि ₹१४९९०० पासून उपलब्ध असतील. कंपनीने सर्व फोन बेस 256GB व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहेत.


