Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शिरूरमध्ये माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यावर गुन्हा दाखल; बँकेचे कर्ज काढून कर्जदाराची फसवणूक

शिरूरमध्ये माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यावर गुन्हा दाखल; बँकेचे कर्ज काढून कर्जदाराची फसवणूक

शिक्रापूर : गणेगाव दुमाला (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढून 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह 11 जणांविरुद्ध शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सचिन बाळासाहेब गरुड (रा. गणेगाव दुमाला, ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिसात फिर्याद दिली आहे.

माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव दुमाला (ता. शिरुर) येथील सचिन गरुड, त्यांच्या दोन मित्रांना २०१९ मध्ये व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांनी अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्याकडे दोन वेगवेगळे कर्ज मागणी केली असता सदर बँकेने सचिन गरुड यांच्या गणेगाव दुमाला येथील जमिनीचे गहाणखत करुन घेत अनेक कागदपत्रे घेतले होते

त्यांनतर सदर अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन्ही बँकांकडून त्यांना कर्ज दिले असे सांगून वेळोवेळी टाळाटाळ केली. दरम्यान एका कर्जात ४० लाख तर एका कर्जात २५ लाख असे ६५ लाख रुपये कर्ज मंजूर करुन त्याबाबत जमिनीवर बोजा लावून कर्जदारांच्या कर्जाची रक्कम त्यांना न देता सर्व पतसंस्थेचे संस्थापक, चालक व व्यवस्थापक यांनी संगनमत करुन स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करुन घेतली.

२०२३ मध्ये त्यांना कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आली. त्यांनी तात्काळ तहसीलदार कार्यालयात जाऊन चौकशी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनतर त्यांनी शिरुर न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने याबाबत सुनावणी घेत शिरुर पोलिसांना या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!