Today शनिवार, 31st ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bank Job ! बँक ऑफ बडोदा येथे नोकरीची संधी; 120000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, असा करता येईल अर्ज…

Bank Job ! बँक ऑफ बडोदा येथे नोकरीची संधी; 120000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, असा करता येईल अर्ज…

पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या बँक ऑफ बडोदा येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 120000 रुपयांपर्यंत मिळू शकतो.

बँक ऑफ बडोदा येथे मानव संसाधन (मुख्य व्यवस्थापक-गुंतवणूकदार संबंध, व्यवस्थापक-ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स, व्यवस्थापक-फॉरेक्स, वरिष्ठ व्यवस्थापक-फॉरेक्स) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 58 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

⇒ पदाचे नाव : मानव संसाधन (मुख्य व्यवस्थापक – गुंतवणूकदार संबंध, व्यवस्थापक – ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स, व्यवस्थापक – फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध, वरिष्ठ व्यवस्थापक – फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध).

⇒ एकूण रिक्त पदे : 58 पदे.

⇒ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

⇒ वेतन/ मानधन : दरमहा रु. 64,820/- ते रु. 1,20,940/- पर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी).

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 19 सप्टेंबर 2025.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2025.

या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.bankofbaroda.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!