नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोन्यानेही इतिहासातील उच्चांक गाठला. आठवड्याभरातील किमतीतील बदल पाहता, एमसीएक्सवर पाच व्यापारी दिवसांत १० ग्रॅम २४ कॅरेट सोने सुमारे ₹५०० ने महाग झाले आहे, परंतु ते अजूनही त्याच्या उच्चांकापेक्षा कमी आहे.
एक मौल्यवान धातू असलेल्या चांदीच्या दरात प्रति किलो १२५८ रुपयांची वाढ झाल्याचे पाहिला मिळाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीतील आठवड्याचा ट्रेंड दिसून आला. प्रति १० ग्रॅम १०९९०० रुपयांवर सध्या सोने गेल्याचे पाहिला मिळत आहे. तर १२ सप्टेंबर २०२५ रोजी त्याची किंमत १०९३७० रुपये होती. परिणामी, एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याचे भाव ५३० रुपयांनी महाग झाले आहेत. त्याचा उच्चांक ११०६६६ रुपये आहे.
गेल्या आठवड्या देशांतर्गत बाजारात सोने खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरला आहे, गेल्या पाच दिवसांत एकूण किमतींमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, १२ सप्टेंबरच्या संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १०९७०७ रुपये आणि शुक्रवारी ही किंमत १०९७७५ रुपये नोंदवली गेली.


