Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! भारत सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार, पगारही चांगला…

Job News ! भारत सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार, पगारही चांगला…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पवन हंस लिमिटेड येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पवन हंस लिमिटेड येथे सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन आणि प्रशासन), व्यवस्थापक (विमान सुरक्षा), सहाय्यक व्यवस्थापक (विपणन आणि व्यावसायिक), सहाय्यक व्यवस्थापक (अधिकृत भाषा), उपप्रमुख उड्डाण सुरक्षा, विकासक, हवाई सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ सल्लागार/सल्लागार (नागरी), वरिष्ठ सल्लागार/सल्लागार (वातानुकूलित), वरिष्ठ सल्लागार/सल्लागार (अभियांत्रिकी), वरिष्ठ सल्लागार/सल्लागार (ऑपरेशन्स), वरिष्ठ सल्लागार/सल्लागार (एनआयएएसएस) यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दिल्ली/नोएडा आणि मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 18 रिक्त पद भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pawanhans.co.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!