Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नवरात्रीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 25 लाख महिलांना मोफत LPG कनेक्शन मिळणार

नवरात्रीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 25 लाख महिलांना मोफत LPG कनेक्शन मिळणार

Free LPG Connection: केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 25 लाख महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. हे कनेक्शन 2025-26 आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) वितरीत केले जातील. यामुळे देशभरातील उज्ज्वला कुटुंबातील सदस्यांची एकूण संख्या 10.60 कोटींवर पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ही घोषणा करताना म्हटले की, मी उज्ज्वला कुटुंबाशी संबंधित सर्व माता आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो. हे पाऊल महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आमच्या संकल्पाला बळकटी देईल. मोदींच्या या पोस्टमध्ये त्यांनी महिलांचा आदर आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाचा उल्लेख केला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या निर्णयाचे अर्थशास्त्रीय आणि सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर 25 लाख नवीन डिपॉझिट-फ्री एलपीजी कनेक्शन देण्याचा निर्णय हा पंतप्रधानांच्या महिला सक्षमीकरणाच्या वचनबद्धतेचा आणखी एक पुरावा आहे. यामुळे माता आणि बहिणींचा आदर आणि सक्षमीकरण अधिक दृढ होईल.

सरकार प्रत्येक कनेक्शनवर 2,050 खर्च करेल. यात मोफत एलपीजी सिलेंडर, गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर आणि इतर आवश्यक उपकरणांचा समावेश असेल. पुरी यांनी सांगितलं की, उज्ज्वला योजना ही केवळ योजना नाही, तर ती देशभरातील एका मोठ्या क्रांतीची मशाल बनली आहे, जी देशाच्या अगदी दुर्गम भागांपर्यंत पोहोचली आहे. मोदी सरकारच्या 300 अनुदानामुळे 10.33 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला कुटुंबांचे सिलिंडर फक्त 553 रुपयांमध्ये रिफिल केले जातात. ही किंमत जागतिक एलपीजी बाजारपेक्षा खूपच कमी आहे.

उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत कनेक्शन देण्याचा हा निर्णय महिलांसाठी सक्षमीकरणाची आणि स्वयंपाकासाठी आर्थिक बचतीची एक सुवर्णसंधी ठरेल. सरकारच्या या उपक्रमामुळे घरगुती ऊर्जेची उपलब्धता वाढेल, महिलांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होईल आणि ग्रामीण तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला मोठा लाभ मिळेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!