Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पत्नी आणि सासूच्या छळाला कंटाळून पुण्यात 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

Pune Crime: पत्नी आणि सासूच्या छळाला कंटाळून पुण्यात 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

Pune Crime: येरवडा परिसरात एका तरुणाने पत्नी आणि सासूच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृताचे नाव अक्षय विजय साळवे (वय 26, रा. गणेशनगर, येरवडा) असे असून, त्याने 6 महिन्यांपूर्वी दिपालीशी विवाह केला होता. त्याची पत्नी दिपाली अक्षय साळवे (वय 24) आणि सासू संगीता अशोक अडागळे (रा. भगवाननगर, गेवराई, बीड जिल्हा) यांच्यावर छळाचा आरोप करण्यात आला आहे.

कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, विवाहानंतर दिपाली आणि तिच्या आईने अक्षयला पालकांपासून वेगळे राहण्यासाठी दबाव आणला. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात तक्रारीदेखील दाखल केल्या होत्या. या मानसिक छळाला कंटाळूनच अक्षयने आपले जीवन संपवले, असा आरोप त्याची आई लक्ष्मी विजय साळवे (वय 52) यांनी केला आहे. दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी अक्षय घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत.

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:

टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416
निमहंस: 91-80-26995000 / 5100 / 5200 / 5300 / 5400
अर्पिता हेल्पलाइन: 080-23655557
आयकॉल: 022-25521111, 9152987821
पीक माइंड: 080-45687786
वांद्रेवाला फाउंडेशन: 9999 666 555
COOJ मेंटल हेल्थ फाउंडेशन: 0832-225252

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!