Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Cloudburst In Barshi: बार्शी तालुक्यात ढगफुटी! भोगावती, नागझरीसह 4 नद्यांना पूर; पिकांचे मोठे नुकसान

Cloudburst In Barshi: बार्शी तालुक्यात ढगफुटी! भोगावती, नागझरीसह 4 नद्यांना पूर; पिकांचे मोठे नुकसान

Cloudburst In Barshi: बार्शी तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भोगावती, नागझरी, नीलकंठा आणि चांदणी नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. वैराग, आगळगाव, मळेगाव, कांदलगाव, श्रीपत पिंपरी, दहिटणे, पिंपळवाडी आणि मांजरे देवगाव या भागातील शेतात पाणी शिरल्याने उभी पिके पाण्यात गेली आहेत.

कासारवाडी येथे बळीराजा हॉटेल पाण्यात बुडाले असून पिंपळगाव पानमधील नीलकंठा नदीला आलेल्या महापुरामुळे दत्त मंदिर परिसरासह वस्त्यांमध्ये पाणी घुसले आहे. तसेच स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कांदलगाव येथे चांदणी नदीचे पाणी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेत शिरले.

याशिवाय, देवगाव भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. आगळगाव येथील नदीला पूर आल्यामुळे बार्शी-आगळगाव वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच बार्शी-तुळजापूर रस्त्यावरच्या ओढ्यांना पूर आल्याने मार्ग बंद करण्यात आला आहे. कव्हे-मोहोळ रोडवरील घोरवढा भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

तथापी, आगळगावजवळील कळंबवाडी (आ) भागातही मुसळधार पावसामुळे शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सुर्डी मंदिर परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुर्डी-रस्तापूर रस्त्यावरून प्रवास करू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बांधावर भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!