पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील १३५ ठिकाणी परवानगी घेऊन फ्लेक्स लावण्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून ऑनलाइन परवानगी दिली जात होती. एका परवानगीवर शहरात इतर ठिकाणीही फ्लेक्स लावले जातात. त्यामुळे फ्लेक्स लावण्यास परवानगी देणे महापालिकेकडून बंद करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सर्वसाधारण सभेची मंगळवारी (दि. १७) बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आंला.
त्यामुळे शहरात कोठेही फ्लेक्स, बॅनर्स व किऑक्स लावता येणार नाही. तसे केल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून कारवाई करून ते फ्लेक्स, बॅनर्स व किऑक्स जप्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिली.


