धाराशिव : राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे, मराठवाड्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे, शेतकऱ्यांची पिके, जनावरे, घरदारं पुराच्या पाण्यात वाहताना दिसत असताना, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या दोन अधिकाऱ्यांचा नाचगाण्यात सहभाग असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा डान्स आणि ठेका धरलेला हा व्हिडिओ पाहून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे पुरग्रस्त शेतकरी मदतीसाठी हात पसरत असताना, दुसरीकडे अधिकारी नाचगाण्यात दंग असल्याचा आरोप करत लोकांनी ‘जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी, पुराच्या पार्श्वभूमीवर उपस्थिती आणि सहभागावर मोठी टीका होत आहे.
शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त
२२ सप्टेंबरला नवरात्राच्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने पुराची लाट आणली. जिल्ह्यातील नद्या-नाले दाबून आल्या, शेतशिवारात पाणी साचले आणि शेतकऱ्यांची पिके, संसारउपयोजनं, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. बीड, धाराशिव, सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक भाग प्रभावित झाले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुरग्रस्त कुटुंबं उघड्यावर पडली असून, मदत आणि पुनर्वसनासाठी मदतीची मागणी जोर धरली आहे. अशा संकटकाळात मंत्री आणि अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलासा दिला. मात्र, त्याच संध्याकाळी तुळजापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग पाहून लोक हैराण झाले आहेत.
नवरात्र महोत्सवात डान्स आणि ठेका, सोशल मीडियावर संताप
तुळजापूर येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर संस्थानने यंदा नवरात्र महोत्सवानिमित्त (२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम राज्यस्तरीय महोत्सव म्हणून घोषित झाला असून, भक्तीगीत, लोकनृत्य, भरुद, जाखडी नृत्य आणि प्रसिद्ध कलाकारांच्या सादरीकरणांचा समावेश होता.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार (IAS) आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव उपस्थित होत्या. मात्र, केवळ उपस्थितीपुरती मर्यादित न राहता, त्यांनी स्टेजवर गाण्यांवर ठेका धरला आणि डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर होत.


