मुंबई : दिग्दर्शिका आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खान तिच्या युट्यूब ब्लॉगसाठी अनेकदा चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या ब्लॉगवर वारंवार दिसतात. यावेळी, अभिनेता रोहित सराफ नवीन ब्लॉगवर दिसला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोहितची आई देखील फराह खान यांच्या ब्लॉगवर दिसली. त्यामध्ये फराह खानने दीपिकाची खिल्ली उडवली. दीपिका दिवसाला फक्त आठ तास काम करते, असे फराह यांनी म्हटले.
रोहितची आई पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली होती. फराह यांचा कुक दिलीपने शोमध्ये दीपिकाच्या उपस्थितीबद्दल विचारले, तेव्हा फराहने दीपिकाच्या आठ तासांच्या कामाच्या वेळापत्रकाबद्दल विनोद केला. ‘आता दीपिकाकडे वेळ नाही’, असे म्हटले आहे. तर रोहित सराफ याची आई पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली होती आणि तीही फक्त फराहच्या ब्लॉगसाठी आल्याचे दिसून आले. फराह खानने रोहितच्या आईला मिठी मारली.
फराहचा कुक दिलीपने विचारले, ‘दीपिका पादुकोण आमच्या शोमध्ये कधी येणार? फराहने सुरुवातीला उत्तर दिले, ‘ज्या दिवशी तू तुझ्या गावी जाशील त्या दिवशी ती येईल’. नंतर दीपिकाच्या आठ तासांच्या कामाच्या वेळापत्रकाची खिल्ली उडवत फराह म्हणाली, ‘दीपिका पादुकोण आता फक्त आठ तासांचेच शूटिंग करते; तिच्याकडे शोमध्ये येण्यासाठी वेळ नाही’.
‘ओम शांती ओम’मधून दीपिकाची एंट्री
दीपिकाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात शाहरुख खानसोबत फराह खानच्या ‘ओम शांती ओम’मधून केली. नंतर तिने फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’मध्ये शाहरुख खानसोबत काम केले. सध्या, दीपिका तिच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत दिसणार आहे.


