नवरात्रीचा उत्सव पूजा, प्रार्थना आणि परंपरा तसेच संस्कृती आणि उत्सवाने भरलेला असतो. या काळात विविध ठिकाणी गरबा आणि दांडिया नाईट्स आयोजित केल्या जातात. जर तुम्ही अशा कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीत असाल तर हवामान, हिट आणि घाम तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
घामाने डाग न पडणाऱ्या मेकअपसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्वचेची तयारी. हे करण्यासाठी, सर्व तेल, घाण आणि मृत त्वचा काढून टाकून तुमचा चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर, हलका, तेल-मुक्त किंवा जेल-आधारित मॉइश्चरायझर लावा. टी-झोनमध्ये मॅटिफायिंग किंवा पोअर-फिलिंग प्रायमर लावल्याने चमक कंट्रोलमध्ये राहते. त्यात चेहऱ्यावर १-२ मिनिटे बर्फाचा तुकडा घासल्याने छिद्रे घट्ट होतील आणि जास्त तेल कमी होईल.
रात्री फिरायला जाताना हेवी फाउंडेशन लावणे चुकीचे ठरू शकते. फुल-कव्हर फाउंडेशन टाळा; त्याऐवजी, बीबी क्रीम किंवा हलके मॅट फाउंडेशन निवडा. नैसर्गिक, समान लूकसाठी ओल्या ब्युटी स्पंजने ब्लेंड करा. टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी तेलकट भागात, विशेषतः कपाळ, नाक आणि हनुवटीवर सैल पावडर लावा. क्रीम ब्लश किंवा कंटूर लावा आणि नंतर त्यावर पावडर लावा असे केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.


