Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! कोल्हापूर जिल्हा परिषदेत नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार, पगारही चांगला मिळणार

Job Alert ! कोल्हापूर जिल्हा परिषदेत नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार, पगारही चांगला मिळणार

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कोल्हापूर जिल्हा परिषदेत अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत खो-खो प्रमुख-क्रीडा प्रशिक्षक, कुस्ती प्रमुख-क्रीडा प्रशिक्षक, कबड्डी प्रमुख-क्रीडा प्रशिक्षक, कबड्डी सहाय्यक-क्रीडा प्रशिक्षक, मैदानी सहाय्यक प्रशिक्षक, रेक्टर (महिला), रेक्टर (पुरुष), रग्बी क्रीडा प्रशिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, कोल्हापूर-४१६००३ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpkolhapur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!